logo

मिस कॉल दिला अन् कुंटणखाना झाला उघड!



पोलिसांची कारवाई : चार महिलांची सुटका

जळगाव : रामानंद पोलिस
स्टेशन हद्दीतील एका भागात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई करत चार महिलांची सुटका केली. यामध्ये दोन परप्रांतीय महिलांचा समावेश आहे.

कारवाई झालेल्या भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्याबद्दल नागरिकांची तक्रार होती.

पोलिसांनी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचला व १५०० रुपये देऊन डमी ग्राहकाला सदर ठिकाणी पाठविले. तेथे गेल्यानंतर त्याने मिस कॉल देताच डीवायएसपी नितीन गणापुरे, पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, आवेश शेख, प्रणय पवार, अमोल ठाकूर, रतनहरी गीते, रवींद्र मोतीराया, महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी घरावर छापा टाकला. तेथे पश्चिम बंगाल, सूरत व स्थानिक दोन महिला आढळल्या. पोलिसांनी त्यांची सुटका केली तर तेथे असलेला एक ग्राहक पळून

या प्रकरणी कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेसह दोन एजंटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई सोमवारी (दि.१९) करण्यात आली.

महिलेसह दोन एजंट ताब्यात
हा कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेसह दोन एजंटाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते

10
636 views