
नगरपरिषद ची अतिक्रमणची दुसरी धडक कारवाई
समीर नवाज भंडारा
भंडारा:- नगर परिषद मार्फत १०० दिवसांच्या विशेष कृती आराखडाची अंमलबजावणी सुरू असून त्यामध्ये प्राथमिकता शहरातील असलेल्या अतिक्रमण मुक्त करण्यासाठी कार्यवाही नगर परिषद मार्फत सुरू आहे. या अगोदर खात रोडवरील अतिक्रमण काढण्यात आले.
शहरातील दुकानदारांना अतिक्रमण काढण्याबाबतचे आवाहन नगर परिषद मार्फत वेळोवेळी करण्यात येते. परंतु अतिक्रमण स्वतः दुकानदारांनी काढून न घेतल्या कारणाने शहरातील मुख्या बाजारपेठ असलेला मार्ग रहदारीस अडथळा करणारे रोडवरिल अतिक्रमण सोमवार दिनांक १९ जानेवारी २०२६ ला नगर परिषदेने व पोलीस प्रशासनाने संयुक्तिक कार्यवाही करत ६० ते ७० अतिक्रमणधारकांवर बुलडोजर चालून अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहे. शहरात ही कारवाई अशी सुरू राहणार असुन सावर्जनिक रस्त्यावर परत अतिक्रमण करणार नाही. याची काळजी दुकानदारांनी घ्यावयाची आहे.
सदर अतिक्रमणची कार्यवाही हि गांधी चौक ते पोस्ट ऑफिस चौक ते बस स्थानक ते त्रिमूर्ती चौक या मार्गावर कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये रस्त्यावर असलेले दुकानासमोरील बांबूचे कच्चे दुकाने, टीनाचे शेडवर, सिमेंटचे रपटे यांच्या वर कार्यवाही करण्यात आली.
सदर अतिक्रमण भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या मार्गदर्शानाखाली पवन कनोजे, संकेत कोचे, मिथुन मेश्राम, सनी सोनेकर, पवन मोगरे, अंकुश हुमणे, आकाश मेश्राम, सागर रगडे, अरविंद गणवीर, ४ फायरमन, चांताराम तिबोडे व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.