logo

अभिनेत्री अश्विनी इरोळे यांच्या पुढाकारातून 'शिवचरित्र' पारायणाचे पिंपळगाव कौडा येथे आयोजन

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला व जगाला प्रेरणा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचे आदर्श नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत या उदात्त हेतूने सुरू झालेला सार्वजनिक शिवचरित्र पारायण हा उपक्रम आज एक व्यापक आध्यात्मिक-सांस्कृतिक चळवळ ठरत आहे.

आशिया खंडात प्रथमच सार्वजनिक स्वरूपात सलग पाच दिवस चालणान्या शिवचरित्र पारायणाची संकल्पना अभिनेत्री अश्विनी भाऊसाहेब इरोळे यांच्या पुढाकारातून साकार झाली आहे. श्रीमद्भभगवद्‌गीता, नवनायांचे सार यांसारख्या धार्मिक ग्रंथांचे पारायण परंपरेने केले जाते. त्याच धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य, स्वराज्यनिर्मितीचे विचार आणि राष्ट्रघडणीची मूल्ये सार्वजनिक स्वरूपात वाचली गेली पाहिजेत, या ठाम भूमिकेतून अभिनेत्री अश्विनी इरोळे यांनी या उपक्रमाची सुरुवात केली. सन २०२१ मध्ये संत निळोबाराय यांच्या पिंपळनेर (ता. पारनेर) येथील पावन भूमीत या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. यंदा या उपक्रमाचा सलग पाचवा वर्षपूर्ती सोहळा साजरा होत असून, गेल्या चार वर्षापासून हा कार्यक्रम दरवर्षी वेगवेगळ्या पवित्र स्थळी भक्तिमय व शिस्तबद्ध वातावरणात पार पडत आहे.

यावर्षी हा उपक्रम पिंपळगाव कौडा (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथे संत रघुनाथ बाबा यांच्या पावन भूमीत शिवजयंतीपूर्व काळात मोठ्या भक्तिभावात पार पडणार आहे. सलग चार दिवस सार्वजनिक शिवचरित्र पारायण सोहळा, दररोज त्रिकाल संध्या मान्यवरांच्या हस्ते महाआरती, सायंकाळी वाल कीर्तनकारांची कीर्तन सेवा, पाचव्या दिवशी महाराजांच्या विचारप्रसारासाठी होम हवन, पंचामृत अभिषेक, महापूजा, महाआरती व महाप्रसाद अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे.

या सार्वजनिक शिवचरित्र पारायणात महाराष्ट्रासह देश-विदेशातील शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. या उपक्रमासाठी दिग्दर्शक भाऊसाहेब इरोळे, रामदास दळवी, किरण लोंढे व सुरेखा पोटधन यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

0
648 views