
गोसेखुर्द धरणाच्या वाढीव पाण्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली
नागरिक भोगतात यातना
प्रेस नोट
कवडसी - नांदोरा, नांदोरा- शहापुर
भंडारा
गोसेखुर्द धरणाच्या वाढीव पाण्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली
नागरिक भोगतात यातना
विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या बॅकवाटरचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे रस्ता फारच खराब झालेला आहे. त्यामुळे नागरीक व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. मात्र पाण्याची पातळी वाढतच आहे. कवडसी ते नांदोरा, नांदोरा- शहापुर रस्त्यावर गोसेखुर्द च्या वाढत्या पाण्यामुळे दोन्ही गावाचे संपर्क तुटले असल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाली आहे.
गोसेखुर्द धरणाच्या वाढीव पाण्यामुळे पातळी वाढल्याने शहापूर - नांदोरा, कवडसी - नांदोरा प्रजिमा -६ या रस्त्यावर ४४/४०० ते ४४/६०० या दरम्यान गोसेखुर्द धरणाच्या बॅकवाटरचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे रस्ता फारच खराब झालेला आहे. त्यामुळे नागरीक व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी नागरिक भोगतात यातना भोगत असतात म्हणून या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य प्रेम वनवे यांना सांगण्यात आले. तेव्हा वनवे यांनी त्वरित गोसेखुचे विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता यांना संपर्क करुन कवडसी ते नांदोरा, नांदोरा- शहापुर रस्त्याचे संपर्क गोसेखुर्द च्या वाढत्या पाण्यामुळे दोन्ही गावाचे संपर्क तुटले असल्यामुळे सदर गावात येणा-या जाणाऱ्या नागरिकांना व शिक्षणाकरीता बाहेर गावी जाणा-या विद्यार्थ्यांना तसेच गावातील शेतकरी वर्गाला कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्ता गोसेखुर्दच्या धरणाचे दरवाजे बंद करून पाण्याची पातळी वाढत आहे.
गोसेखुर्द धरणाच्या बॅकवाटरचे पाणी रस्त्यावरुन वाहत आहे, त्यामुळे सदर रस्ता खराब झाला आहे. व वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. तरी सदर रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करुन देण्यात यावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रेम वनवे यांनी केली आहे. त्या मागणीचे निवेदन उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, क्र.१ भंडारा, कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग भंडारा, जिल्हाधिकारी साहेब, कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द विभागीय पथक, नागपूर., उप जिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग भंडारा. यांना देण्यात आले आहे.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015