अंबरनाथ पूर्वात थरार! पाले गावातील अंटालीका टॉवरजवळ कारला अचानक आग; तीन गाड्या जळून खाक
अंबरनाथ पूर्वेकडील पाले गाव परिसरात असलेल्या अंटालीका टॉवर येथे आज अचानक थरारक घटना घडली. पार्किंगमध्ये उभी असलेल्या एका कारला ऑटोमॅटीक आग लागली आणि क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. पाहता पाहता या आगीने बाजूला उभ्या असलेल्या आणखी तीन कारनाही वेढले आणि चारही वाहने पूर्णपणे जळून खाक झाली.
आगीचे लोळ आणि दाट धुरामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रहिवाशांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत मोठे आर्थिक नुकसान झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. परिसरातील नागरिकांनी वाहनांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे.