logo

जळगावात निकालावेळी गोंधळ दोन गुन्हे दाखल



जळगाव : महापालिकेच्या मतमोजणी दरम्यान घातलेला गोंधळ व नंतर दगडफेकीप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे करण्यात आले आहेत. यामध्ये उद्धवसेनेचे पराभूत उमेदवार कुलभूषण पाटील, मयूर कापसे, गुलाबराव वाघ, गजानन मालपुरे यांच्यासह २०० ते २५० जणांचा समावेश आहे.

शुक्रवारी निवडणुकीच्या मतमोजणीदम्यान माजी महापालिका महापौर कुलभूषण पाटील यांनी केलेली आली होती. त्यानंतर झालेल्या गोंधळासंदर्भात तहसीलदार विनोद पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दुसरी फिर्याद पोहेकों प्रदीप पाटील यांनी एमआयडीसी मतमोजणी सुरू असलेल्या वखार महामंडळाच्या पोलिस ठाण्यात दिली. त्यात म्हटले आहे की, प्रवेशद्वार क्रमांक दोनजवळील मुख्य बॅरिकेडिंगनजीक दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी कुलभूषण पाटील, पंकज पाटील, गुलाबराव वाघ, विकास चौधरी, आबा कापसे, मयूर कापसे, गजानन मालपुरे, भाऊसाहेब पाटील, विकास निकम यांच्यासह २०० ते २५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

4
36 views