logo

ग्रीन नेचर फाउंडेशन तर्फे लाखनी येथे स्थलांतरित पक्ष्यांविषयी जनजागृती कार्यक्रम यशस्वी स्थलांतरित बदक चित्रकला व रांगोळी स्पर्धाचे आयोजन

प्रेस नोट
लाखनी,भंडारा

ग्रीन नेचर फाउंडेशन तर्फे लाखनी येथे स्थलांतरित पक्ष्यांविषयी जनजागृती कार्यक्रम यशस्वी
स्थलांतरित बदक चित्रकला व रांगोळी स्पर्धाचे आयोजन
विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- लाखनी येथील ग्रीन नेचर फाउंडेशन अर्थात ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी तर्फे विदेशातून भारतात हिवाळ्यामध्ये स्थलांतरित झालेल्या बदक व पक्ष्यांविषयी जनजागृती व्हावी याकरिता स्थलांतरित बदक चित्रकला व रांगोळी स्पर्धा व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन ताजुश शरिया कोचिंग क्लासेस लाखनी येथे करण्यात आले.
यावेळी ग्रीन नेचर फाउंडेशन लाखनी चे कार्यवाह प्रा. अशोक गायधने, अध्यक्ष अशोक वैद्य व पदाधिकारी भैय्याजी बावनकुळे, अशोक नंदेश्वर, ताजुश शरिया कोचिंग क्लासेस चे संचालिका मिनाझ मोटलानी उपस्थित होत्या.
यावेळी प्रा. अशोक गायधने यांनी नागझिरा - नवेगाव अभयारण्यात आलेल्या स्थलांतरित बदक व पक्षी तसेच नागपूरचे पक्षीअभ्यासक एम.एस. आर. शाद व चंद्रपूरचे ग्रामीण बँक प्रादेशिक व्यवस्थापक तथा पक्षी अभ्यासक राजकुमार जाधव यांच्यासोबत केलेली पक्षीनिरीक्षण मोहिमेचे अनुभव विशद केले.
स्थलांतरित बदक चित्रकला स्पर्धेमध्ये मिताली गायधनी व याशी यांच्या चक्रवाक बदक रांगोळीला तर द्वितीय क्रमांक पारूल खेडीकर व प्रिथि भोंगाडे यांच्या तलवार बदक या रांगोळीला तर तृतीय क्रमांक प्रिन्सी बावनकुळे हिच्या लालसरी बदक व विश्वजा शिनगारे हिच्या चमचाचोच बदक रांगोळीला प्राप्त झाला.
चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक सुखदा खेडीकर हिला तर द्वितीय क्रमांक प्रिन्सि बावनकुळे हिला व तृतीय क्रमांक मिताली गायधनी व जान्हवी निर्वाण यांना प्राप्त झाला. प्रोत्साहनपर क्रमांक निराली वंजारी तसेच अभिधा थोटे यांना प्राप्त झाला.
दोन्ही स्पर्धेचे परीक्षण ग्रीन नेचर फाउंडेशन चे पदाधिकारी भैय्याजी बावनकुळे, अशोक वैद्य, अशोक नंदेश्वर, ताजुश शरिया कोचिंग क्लासेसचे संचालिका मिनाझ मोटलानी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता लाखनी नगरपंचायतचे कृतिशील नगरसेवक संदीप भांडारकर, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. मनोज आगलावे, भैय्याजी कृषक सेवा केंद्रचे पवन बावनकुळे, देशमुख एक्स रे व सोनोग्राफी क्लिनिकचे डॉ. प्रमोद देशमुख, पोलिस उपायुक्त मुंबई नेताराम मस्के, श्री हॉस्पिटलचे योगेश गिऱ्हेपुंजे, डॉ. छगन राखडे, नेत्र चिकित्सक दिपक नवखरे, नाना ऑप्टिकल्सचे शरद वाघाये, प्राचार्य प्रदिप गायधनी व शिक्षिका वैशाली गायधनी सेवानिवृत्त प्राचार्य अशोक हलमारे व माधवराव भोयर, सेवानिवृत्त कलाशिक्षक दिनकर कालेजवार, एम पब्लिक स्कूलचे संचालक राजकुमार नंदेश्वर, निर्वाण इलेक्ट्रिकल्सचे दीपक निर्वाण, कार्यकारी अभियंता रजत अतकरे व मुख्य कार्यकारी अभियंता ऋतुजा वंजारी, सेवानिवृत्त नायब तहसीलदार गोपाल बोरकर व सरीसृप संशोधक विवेक बावनकुळे, वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर मयूर गायधने, निसर्गमित्र पंकज भिवगडे, सलाम बेग, धनंजय कापगते, युवराज बोबडे, रोशन बागडे, राकेश हुमे, गगन पाल, सानगडी येथील निसर्गप्रेमी प्रदीप सोमवंशी व चुन्नीलाल लोथे इत्यादींनी सहकार्य केले.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

3
47 views