logo

नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या बोगस एमबीबीएस एम एस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल

रोहन कळसकर

चंद्रपूर:- फेसबुक व्हाट्सअप अशा सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्व:ताला न्यूरोलॉजीस्ट डॉक्टर असल्याचे भासवून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत वरोरा तालुक्यातील एका महिलेसह तिच्या नातेवाईकांची पाच लाख 64 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी वरोरा पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे सूत्रांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर 2024 मध्ये वरोरा तालुक्यातील चुरखट्टी येथील महिलेला रुद्र पाटील या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली होती . स्वतःला एमबीबीएस. एम एस न्यूरोलॉजीस्ट डॉक्टर असल्याचे भासवून छत्रपती संभाजी नगर येथील गव्हर्नट हॉस्पिटल येथे कार्यरत असल्याचे खोटा दावा आरोपी रुद्र पाटील यांनी केला .

डॉक्टरांच्या एप्रन घातलेल्या फोटो व तसेच गोरमेंट हॉस्पिटल येथील कथित दृष्टे पाठवत त्याने विश्वास संपादन केले.
त्यानंतर पुणे येथील गोरमेंट मेडिकल हॉस्पिटल येथे गुप्त भरती असल्याचे सांगून नोकरीसाठी डोनेशन लागेल असे आमिष दाखवण्यात आले. वरोरा, भद्रावती ,मुल, पोभुर्णा, ब्रह्मपुरी ,बल्लारपूर, जिवती, राजुरा येथे पोस्टिंग मिळेल असे सांगून महिलेसह त्याच्या कुटुंबीय व नातेवाईकांना विश्वासात घेतले आणि त्यासोबत आणखी दोन नातेवाईकांनाही आरोपी रुद्र पाटील यांनी संपर्क करून फसवणूकीच्या जाळ्यात ओढले.

नोव्हेंबर 2024 ते एप्रिल 2025 या कालावधीत फोन पे गुगल पे व विविध खात्या द्वारे वेगवेगळ्या नावाने एकूण पाच लाख 64 हजार आरोपीने उकळले त्यानंतर महिलेने आरोपींना नोकरी बाबत विचारणा केली असताना आरोपी टाळाटाळ करीत फोन उचलणे बंद केले. उलट महिलेवर राष्ट्रीय पक्षाच्या व विविध प्रकारच्या दबाव आणत धमकी देऊन महिलेला ब्लॅकमेल करण्याच्या प्रयत्न केला.

मात्र पोलिसांच्या तपासात आरोपीचे खरे नाव किशन रमेश राव जाधव राहणार परभणी असे असल्याचे स्पष्ट असून तो सोशल मीडियावर वेगवेगळ्या नावाने प्रोफाईल ओपन करून व वेगवेगळ्या पद्धतीने आपली ओळख निर्माण करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी वरोरा पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम भारतीय संविधान कलम 66 ( क) , 66 (ड) तसेच भारतीय न्याय संहिता कलम 318 (4) 319 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमुक्का यांच्या आदेशानुसार वरोरा येथील पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबे करीत आहे .

दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून नोकरीचे आमिष गुप्त भरती व ऑनलाईन व्यवहार करताना नागरिकांनी अधिक सतर्क राहावे असे आव्हान वरोरा पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबे करीत आहे




0
35 views