जळगाव महानगरपालिकेत महायुतीचा ऐतिहासिक विजय; महाविकास आघाडीला मोठा धक्का
जळगाव – उत्तर महाराष्ट्रातील राजकारणाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने (भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी) ऐतिहासिक आणि एकहाती विजय मिळवला आहे. एकूण ७५ जागांपैकी महायुतीने ६९ जागांवर कब्जा मिळवून महापालिकेवर निर्विवाद सत्ता प्रस्थापित केली आहे.मतमोजणीपूर्वीच महायुतीचे १२ उमेदवार (भाजप ६, शिवसेना ६) बिनविरोध निवडून आल्यामुळे विजयाची दिशा आधीच स्पष्ट झाली होती. प्रत्यक्ष निकालात भाजपने ४७ पैकी ४६ जागा जिंकून जवळपास शंभर टक्के यश मिळवले, तर महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट) केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांना फारच मर्यादित यश मिळाले.राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की जळगावमधील या निकालामुळे महायुतीच्या लोकप्रियतेचा ठसा उमटला असून, महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. आगामी स्थानिक व राज्यस्तरीय निवडणुकांवर याचा परिणाम दिसून येऊ शकतो.