logo

गणपती मंदिरावर दगडफेक व शुभम वाणीवर प्राणघातक हल्ला : आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी, पोलीस निरीक्षकांना निवेदन


गणपती मंदिरावर दगडफेक व शुभम वाणीवर प्राणघातक हल्ला : आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी, पोलीस निरीक्षकांना निवेदन

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर शहरात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या व कायदा-सुव्यवस्थेला गंभीर आव्हान देणाऱ्या घटनेप्रकरणी आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मा. पोलीस निरीक्षक, अमळनेर पोलीस स्थानक यांना निवेदन सादर करण्यात आले.
दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास, साळीवाडा, अमळनेर येथील रहिवासी शुभम दिलीप वाणी हे घरी असताना काही समाजकंटकांनी त्यांना घराबाहेर चौकात बोलावले. त्यानंतर कैसर आबीद सय्यद, जाकीर पठाण, नावेद शेख समीर, समीर शेख (मोईनोद्दीन), इमरान शेख, नासिर शेख, साहिल शेख यांनी पूर्वनियोजित कट रचून परिसरातील हिंदू समाजाचे आराध्य दैवत असलेल्या गणपती मंदिरावर दगडफेक करून धार्मिक भावना दुखावण्याचा व तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
यानंतर सदर आरोपींनी शुभम दिलीप वाणी यांच्यावर जिवे मारण्याच्या उद्देशाने सामूहिक हल्ला (Mob Lynching) केला. या अमानुष हल्ल्यात लोखंडी रॉड, चॉपर, चाकू व दगडांचा वापर करून शुभम यांना बेदम मारहाण करण्यात आली असून ते अत्यंत गंभीर जखमी झाले आहेत. हा प्रकार केवळ मारहाणीचा नसून खुनाचा प्रयत्न, दंगल भडकावणे व धार्मिक भावना दुखावणे असा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या घटनेला अनेक दिवस उलटूनही एकही आरोपी अटकेत नसणे तसेच तपासाला अपेक्षित गती नसणे, ही बाब अत्यंत गंभीर असून यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यामागे पोलीस प्रशासनावर राजकीय अथवा बाह्य दबाव असल्याची शंका नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. या घटनेमुळे अमळनेर शहरातील हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

निवेदनाद्वारे पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत —

सदर प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.

IPC अंतर्गत खुनाचा प्रयत्न, दंगल, धार्मिक तेढ निर्माण करणे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अशी कठोर कलमे लावण्यात यावीत.

प्रकरणाचा वेगवान, निष्पक्ष व पारदर्शक तपास करून पीडित कुटुंबास तात्काळ न्याय देण्यात यावा.

अन्यथा या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व इतर सामाजिक संघटना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यास बाध्य होतील, असा इशाराही देण्यात आला असून त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
यावेळी सचिन चौधरी, विनायक चौधरी, विजय बारी, सागर बारी, योगिराज चव्हाण यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

3
59 views