भंडारा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी चंद्रकला भोपे.
स्वीकृत सदस म्हणून चैतन्य उमाळकर, सचिन कुंभलकर, अॅड. कैलास भुरे तसेच विनयमोहन पशिने यांची वर्णी.
समीर नवाज भंडारा.
भंडारा: भंडारा नगर परिषदेच्या आज दि. १६ जानेवारी रोजी पार पडलेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष चंद्रकला भोपे यांची बिनविरोध निवड झाली. तसेच भंडारा नगरपरिषद भाजपा गटनेते आशिष गोंडाने यांनी भारतीय जनता पार्टी तर्फे स्वीकृत सदस्य म्हणून भाजपचे चैतन्य उमाळकर, सचिन कुंभलकर आणि अॅड. कैलाश भुरे यांची बिनविरोध निवड केली . तसेच शिवसेनेच्या गटातून अॅड. विनयमोहन पशिने यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान नगराध्यक्षा मधुरा मदनकर आणि मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले उपस्थित होते. यावेळी नगरपरिषदेच्या आवारात मोठी गर्दी होती. विजयानंतर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गांधी चौकात फटाके फोडले आणि गुलाल उधळला. विश्रामभवनात आ. डॉ .परिणय फुके यांनी भाजपच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.