
खान्देश शिक्षण मंडळ व अमळनेर नगरपरिषदेतील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा गौरव सोहळा उत्साहात
खान्देश शिक्षण मंडळ व अमळनेर नगरपरिषदेतील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा गौरव सोहळा उत्साहात
अमळनेर प्रतिनिधी :
खान्देश शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षपदी श्री. निरजभाऊ अग्रवाल तसेच कार्योपाध्यक्षपदी श्री. जितेंद्रभाऊ (छोटूभाऊ) जैन यांची निवड झाल्याबद्दल, तसेच अमळनेर नगरपरिषदेतील उपनगराध्यक्षपदी श्री. प्रशांत निकम व स्विकृत नगरसेवकपदी श्री. प्रताप साळी, श्री. महेश देशमुख, सौ. स्वप्ना विक्रांत पाटील, सौ. योगिता विश्वनाथ (रवींद्र) पाटील, श्री. कैलास नामदेव पाटील ,खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त सौ वसुंधरा दशरथ लांडगे,संचालक पकंज मुंदडा
यांच्या निवडीबद्दल एका विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला आणि त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. हा सत्कार मंगरूळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. प्रकाश पाटील व पत्रकार ईश्वर महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक श्री. प्रकाश पाटील यांनी सांगितले की, “कोणाची निवड असो, वाढदिवस असो किंवा सुख-दुःखाचा प्रसंग असो, समाजातील प्रत्येक घटकाच्या पाठीशी उभे राहणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे. निवड झालेल्या व्यक्तींना त्यांच्या कार्यात अधिक प्रेरणा मिळावी, त्यांच्यातील जबाबदारीची जाणीव वृद्धिंगत व्हावी, याच उद्देशाने अशा सत्कारांचे आयोजन केले जाते.”
या गौरव सोहळ्यामुळे उपस्थितांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनीही समाजहितासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.