logo

बल्लारपुर शहरातील समाजसेविका जयश्री प्रणय काकडे यांनी पुस्तकाचे वाण वाटून केली मकर संक्रांति साजरी











रोहन कळसकर


चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुर शहरातील रहिवासी असलेले समाजसेविका तथा अधिपरिचारिका सौ. जयश्री प्रणय काकडे व तिची सासू सौ. सिमा रमेश काकडे यांनी संक्रांत वाणात शहिद वीर भगतसिंग, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ व इतर महानायिकांच्या पुस्तकांचे वाण देऊन साजरी केली. मकर संक्रांती तसेच त्याच्या चिरंजिव अभिर ची लुट (बोरव्हाण ) हे गोळ्या बीस्किटाने न करता पेन्सिल रब्बर व इतर शालेय उपयोगी वस्तूने लुट करून साजरी केली. त्याच्या या कल्पनेने बल्लारपुरात नाही तर चंद्रपुर जिल्ह्यात आदर्श मकर संक्रांतीची दिशा खऱ्या अर्थाने जयश्री प्रणय काकडे यांनी समाजाला तसेच येणाऱ्या युवा पिढींना दिली.
तसेच एक मोलाचा संदेश सुद्धा दिला आहे की वानात नुसते भांडे न वाटता या येणाऱ्या संकटात व जगातल्या प्रत्येक क्षणोक्षणी कुठल्या पद्धतीने आपलं आयुष्य जगलं पाहिजे तसेच वीर भगतसिंग, छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिज्योतीच्या विचारांच कसं सोनं केलं पाहिजे या संदर्भात पुस्तकाच्या माहितीने दिली एक उपदेश जयश्री प्रणय काकडेने दिला तसेच त्यांच्या घरातील सर्व सदस्य हे जनजागृती च्या कार्यात अग्रेसर आहे. त्यात आता जयश्री यांचा सुद्धा खारीचा वाटा समाजात दिसु लागला आहे.

26
5798 views