logo

बांबरुड राणीचे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळात "बाल आनंद मेळावा" ...!

बांबरुड (राणीचे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा(सेमी इंग्रजी CBSC) येथे बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला..
पाचोरा प्रतिनिधी :-
(जिल्हाध्यक्ष किरण अशोक सुर्यवंशी )
बांबरूड राणीचे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा(सेमी इंग्रजी CBSC) येथे आज दि.16 जानेवारी रोजी "बाल आनंद मेळावा" मोठ्या उत्साहात पार पडला.

जि.प शाळेतील बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी श्री. विजय पवार साहेब, माजी पंचायत समिती सदस्य ललित वाघ यांच्या हस्ते फित कापुन करण्यात आले.

याकार्यक्रमाला प्रमुख अतिथी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.रामकृष्ण पाटील, श्री. शशिकांत भाऊ वाघ, किरण सूर्यवंशी, गुलाब भाऊ तडवी,सुनील कोळी, अंगणवाडी ताई, माता पालक संघाच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री अमोल पाटील तसेच सखी सावित्री समितीच्या सदस्या रितू समाधान गरुड व विद्यार्थी सुरक्षा समिती सदस्य उपस्थित होते.

बाल मेळाव्यात शालेय विद्यार्थ्यांनी इडली- सांबर, डोसा, गव्हाचे कुरकुरे, उसळ, पाव-वडा, कचोरी, पोहे, भेळ, पास्ता, खमंग इ.विविध प्रकारच्या ४५ खाद्य पदार्थाचे स्टॉल लावलेले होते.
या स्टॉलवर विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. बाल आनंद मेळाव्यास मोठ्या संख्येने गावातील महिला व पुरुष उपस्थित होते. या मेळाव्यातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष व्यवहार ज्ञानाचा अनुभव घेत, स्वावलंबी व आत्मनिर्भयतेचे धडे घेतले.याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडुन वाहत होता.

कार्यक्रम यशस्वितेसाठी मुख्याध्यापक श्री. सुभाष जगताप,श्री भाऊसाहेब पवार ,श्री प्रवीण सोनकुल,श्री नितीन साळुंखे, श्री अनिल बेलदार,श्री भटूकांत चौधरी,श्री किशोर महाजन,श्री महेश गवादे श्री राकेश धायबर श्रीमती दिपाली दाळवाले, ज्योती चौधरी यांनी परिश्रम घेतले.

2
200 views