logo

वाचन संस्कृती जपणे काळाची गरज: प्राध्यापक डॉ विजय गायकवाड

रिसोड : महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित बी ए एम एस मेडिकल कॉलेज देगाव महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनाचे श्रम संस्कार शिबिर खडकी सदार येथे आयोजित करण्यात आलेले असून आज दुसऱ्या दिवशी "वाचन संस्कृती काळाची गरज" या व्याख्यानमालेला प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर विजय शशिकला रामराव गायकवाड विभागप्रमुख स्वर्गीय पुष्पादेवी पाटील कॉलेज रिसोड हे होते. तर व्यासपीठावर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉक्टर दीपक ढोणे व अध्यक्ष म्हणून प्राध्यापक प्रतीक रेवनवार उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉ विजय गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की. "वाचन संस्कृतीची आजच्या काळात नितांत आवश्यकता आहे, कारण ती आपल्याला ज्ञानी, सुसंस्कारी आणि विचारशील बनवते, ज्यामुळे जीवन समृद्ध होते; ही वाचन संस्कृती सामाजिक व वैयक्तिक विकासासाठी, तणावमुक्तीसाठी, आणि नवीन कल्पना व संस्कृती समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. तसेच सोशल मीडियाच्या युगात आपली बुद्धिमत्ता टिकवून ठेवण्यासाठी 'वाचाल तर वाचाल' हा मंत्र आजही महत्त्वाचा आहे. त्यामुळे आयुर्वेद मेडिकल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक चांगला डॉक्टर बनण्यासोबतच समाजाचा तारणहार सुद्धा बनावे जे की सामाजिक समरसता टिकवण्यासाठी व समाजासाठी महत्वाचे आहे व हे जे की वाचन केल्याने शक्य होईल व यामुळे आपली वाचन संस्कृती वाढीस लागून ती टिकेल सुद्धा" असे प्राध्यापक डॉक्टर विजय गायकवाड यांनी आपले बहुमूल्य विचार मांडले. या कार्यक्रमाला प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिषेक गोरे, सूत्रसंचलन पवन पांढरे व आभार स्वप्नील गावंडे या विद्यार्थ्याने केले.

8
1257 views