आयोगाकडून बिनविरोध जागांचा निकाल जाहीर
भाजप व शिंदेसेनेच्या प्रत्येकी सहा उमेदवारांचा समावेशजळगाव : महानगरपालिकानिवडणुकीत बिनविरोध झालेल्या जागांचा निकाल निवडणूक आयोगाने १५ जानेवारी रोजी जाहीर केला. राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांच्या स्वाक्षरीचे पत्र महापालिकेला प्राप्त झाले. भाजप आणि शिंदेसेनेचे एकूण १२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी या संदर्भातील अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर केला होता.भाजपकडून प्रभाग ७ 'अ' मधून दीपमाला मनोज काळे, प्रभाग ७ 'ब' मधून अंकिता पंकज पाटील, प्रभाग ७ 'क' मधून विशाल सुरेश भोळे, प्रभाग १२ 'ब' मधून उज्ज्वला बेंडाळे, प्रभाग १३ 'क' मधून वैशाली अमित पाटील आणि प्रभाग १६ 'अ' मधून विश्वनाथ सुरेश खडके यांचा समावेश आहे.२ शिंदेसेनेचे प्रभाग २ 'अ' मधून सागर श्यामकांत सोनवणे, प्रभाग २'अ' मधून मनोज दयाराम चौधरी, प्रभाग ९ 'ब' मधून प्रतिभा देशमुख, प्रभाग १८ 'अ' मधून डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे, तर प्रभाग १९ 'अ' मधून रेखा चुडामण पाटील आणि प्रभाग १९ 'ब' मधून विक्रम ऊर्फ गणेश सोनवणे बिनविरोध झालेले आहेत.