logo

धरणगावात शिवरत्न जिवाजी महाले यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेचे पूजन.

धरणगाव येथे नाभिक समाज व इतर समाजबांधवांच्या प्रमुख उपस्थितीत शिवरत्न जिवाजी महाले तसेच संत सेना महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमांचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी प्रतिमांना माल्यार्पण व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा धरणगाव नगरपरिषदेचे गटनेते निलेश चौधरी यांनी मार्गदर्शन करताना, शिवरत्न जिवाजी महाले यांच्याकडून कर्तबगार वृत्ती, शौर्य आणि स्वामिनिष्ठा या गुणांची प्रेरणा समाजाने घ्यावी, असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी नगरसेवक विलास महाजन, पवन महाजन, परमेश्वर महाजन, सुनील चौधरी, नाभिक समाजाचे अध्यक्ष अशोक झुंजारराव, जिवाजी सेना तालुका अध्यक्ष रविंद्र निकम, शहराध्यक्ष अमोल महाले, ज्ञानेश्वर झुंजारराव, संजू झुंजारराव, कैलास झुंजारराव, उज्वल महाले, गणेश गायकवाड, सोपान वारुडे, किरण गायकवाड, गणेश झुंजारराव, संजू फुलपगार आदी समाजबांधव उपस्थित होते.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र धनगर, जिल्हा युवक कार्याध्यक्ष मोहित पवार, तालुका उपाध्यक्ष रमेश महाजन, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष खलील खान, शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, कार्याध्यक्ष रविंद्र वाघ, सचिव नंदू धनगर, युवक शहराध्यक्ष जुनेद बागवान, शहर कार्याध्यक्ष सागर महाले, उपाध्यक्ष समाधान महाजन, साहिल खान यांच्यासह बहुसंख्य समाजबांधव व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला.

8
189 views