logo

"कोल्हापूर शहर शाडूमाती मूर्तिकारातर्फे वैदर्भीय मूर्तिकारांच्या संपर्क संवाद यात्रेचा निरोप समारंभ."

कोल्हापूर
श्री संत गोरोबा कुंभार शाडू माती मूर्तिकार संघटनेच्या वतीने प. महाराष्ट्रात पर्यावरणपूरक उत्सवाच्या जनजागृतीसाठी आयोजित वैदर्भीय मूर्तिकारांच्या संपर्क -संवाद यात्रेचा निरोप समारंभ कोल्हापूर येथील श्री संत गोरोबा कुंभार मंडप येथे पारंपारीक कुंभार मूर्तिकार हस्तकला कारागीर संघ कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत कुंभार यांचे अध्यक्षतेखाली व हलगी सम्राट अनिल वागवेकर, संघटनेचे पदाधिकारी , संघटनेचे पदाधिकारी सतिश वडणगेकर, रणधीर वडणगेकर,दिनकर कुंभार, उमेश कुंभार,
आनंदा वडणगेकर,महेश वडणगेकर,राजेंद्र निगवेकर, ,नितीन ब्रह्मपुरे या
प्रमुख अतिथीच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला. करवीर नगरीच्या मूर्तिकारांच्या वतीने या अभिनव उपक्रमाची कौतुक करीत पुष्प देऊन सर्व वैदर्भीय मूर्तिकारांचे स्वागत करण्यात आले.
निरोप समारंभप्रसंगी माहिती देतांना यात्रा प्रमुख व पारंपरिक मूर्तिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुरेश पाठक यांनी सांगितले की, धर्म, संस्कृती, कला, पर्यावरण व रोजगाराच्या संरक्षणासाठी पर्यावरणपूरक उत्सवात मूर्तिकारांची महत्वपूर्ण भूमिका आहे. पर्यावरणपूरक उत्सवाची संस्कृती संपूर्ण महाराष्ट्रात रुजावी या हेतूने पारंपारीक मूर्तिकार व हस्तकला कारागीर संघांचे वतीने दि. 8 ते 13 जाने ला गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर अमरावती, यवतमाळ येथील पारंपारिक मातीच्या मूर्तिकारांची संपर्क -संवाद यात्रा आयोजित करण्यात आली.
संवाद यात्रेच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कलेसाठी प्रसिद्ध असलेल्या कलानगरीतील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा व कलाकारांशी प्रत्यक्ष भेट, कोल्हापुरी कलेचे प्रकार, निर्मिती प्रक्रिया, मूर्तिकलेची मागणी, मूर्तिकारांचे जीवनमान व त्यांच्या समस्या कलाकारांशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधून त्यांच्या कलागुणांना आत्मसात करण्यासाठी पारंपारीक मूर्तिकारांच्या समूहाने सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर कर्नाटकातील कोण्णूर, खानापूर, डुक्करवाडी येथे प्रत्यक्ष भेटून तेथील पारंपारिक मूर्तिकारांशी संपर्क साधून संघटनात्मक विषयावर सकारात्मक चर्चा केली व पर्यावरणपूरक मूर्ती निर्मिती व पर्यावरणपूरक उत्सव या राष्ट्रीय अभियानात प्रत्येकानी वैयक्तिक व सामूहिक सहभाग घ्यावा असे भावनिक आव्हान केले. या प्रसंगी प्रमुख अतिथी व रंग निर्मिती च्या क्षेत्रातील अनुभवी तज्ञ अरुण निगवेकर यांनी मूर्तिकारांना प्रमाणित पर्यावरणपूरक रंग निर्मिती व सहज उपलब्धते विषयी माहिती देत ग्राहकांना शंभर टक्के पर्यावरणपूरक मूर्ती उपलब्ध करून देण्याचे आव्हान केले. त्यामुळे गणेशभक्तांची मातीच्या मूर्तीवरील विश्वासारह्यता वाढेल. निरोप समारंभाचे अध्यक्ष ज्येष्ठ मूर्तिकार श्रीकांत कुंभार यांनी वैदर्भीय मूर्तिकारांच्या या अभिनव उपक्रमाने पारस्परातील संपर्क-संवादाणे नावीन्यपूर्ण कला कौशल्याचे आदान प्रदान होण्या बरोबरच व्यावसायिक दृष्टी प्रगाढ होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला. समारंभाचे संचालन मूर्तिकार सतीश वडनगेकर यांनी केले तर आभार रणधीर वडणगेकर यांनी मानले. निरोप समारंभाला कोल्हापूर जिल्ह्यातील अवी निगवेकर, दिनकर कुंभार, उमेश कुंभार, आनंदा वडणगेकर, राजेंद्र निगवेकर, नितीन ब्राम्हपुरे सह बहुसंख्याने मूर्तिकार उपस्थित होते.

13
149 views