logo

सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणूक : ५२७ मतदान केंद्रांवर मतदानास सुरुवात

सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी आज सकाळी शांततेत मतदानास सुरुवात झाली आहे. शहर व उपनगरांतील एकूण ५२७ मतदान केंद्रांवर मतदार आपला हक्क बजावत आहेत. सकाळपासूनच काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात असून, सीसीटीव्ही व वेबकास्टिंगद्वारे देखरेख केली जात आहे. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मतदान संध्याकाळी ठरलेल्या वेळेपर्यंत सुरू राहणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाने केले आहे.

3
63 views