
बहुजन हिताय ! बहुजन सुखाय ! विचार मंच ! महादुला(कोराडी)नागपूर यांच्या वतीने बहुजन समाज जागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन
बहुजन हिताय ! बहुजन सुखाय ! विचार मंच ! महादुला(कोराडी) यांच्या वतीने बहुजन समाज जागृती अभियान अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त थोर पुरुषांच्या जीवन चरित्रावर स्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण भीमा कोरेगाव मानवंदना, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने अनागारिक धम्मपाल बुद्ध विहार महादुला च्या पटांगणात( झेंडा चौक ) येथे घेण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. अमिताताई इंगोले व कार्यक्रमाचे उद्घाटक आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयु.अनिताताई पाटील ( शिक्षिका विद्यामंदिर ) हे उपस्थित होते. बहुजन हिताय ! बहुजन सुखाय !विचार मंच ! चे संस्थापक अध्यक्ष आयु.सी.सी.वासे आणि मंचाचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते व विशाल सोनवणे तसेच नवनिर्वाचित नगरसेविका आयु.आम्रपाली सोनारे मंचावर उपस्थित होते, महामाया महिला मंडळाचे कार्यकर्ता सुद्धा उपस्थित होते. सहयोग म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समितीचे सदस्य उपस्थित होते. ही स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वाढवते "पंखांना बळ लढा संघर्षाच्या" या ब्रीदवाक्य प्रमाणे प्रतिकूल परिस्थितीतही ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असलेली जिद्द आणि स्पर्धात्मक कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित करते ज्यामुळे भविष्यातील आव्हानासाठी विद्यार्थी सज्ज होतात. ही परीक्षा केवळ गुणांसाठी नसून विद्यार्थ्यांच्या डोक्यात महापुरुषांचे विचार पेरून त्यांना एक सक्षम,सजग आणि जबाबदार नागरिक बनविण्यासाठी चालवलेली एक ज्ञानाची चळवळ आहे,अशाप्रकारे मार्गदर्शन करण्यात आले व प्रथम पुरस्कार कोकिळा ओहेकर(2000₹) तर्फे यश सोनारे,
द्वितीय पुरस्कार उमा पातोडे (1500₹) तर्फे वैष्णवी मडामे,
तृतीय पुरस्कार संगपाल भंते (1000₹) तर्फे वंश गडपायले,
चौथे पुरस्कार जयश्री कांबळे (500₹) तर्फे अंशुल गजभिये
यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना देण्यात आले इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस महानंदा दुग्ध डेअरी (महादुला) यांच्यातर्फे देण्यात आले. आणि या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन जयश्री कांबळे यांनी केले तर प्रदीप काळे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नीलकमल बोरकर, दयानंद कांबळे, आशिष मेश्राम, मिलिंद इंगोले आणि मंचाचे इतर कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडले.