logo

जानेवारी ते जून दरम्यान सुट्ट्यांचा धमाका; ६ महिन्यांत ७६ दिवस शाळांना सुट्ट्या



[ मुंबई | १३ जानेवारी २०२६ ]

➡️राज्यातील शालेय शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक वर्षाचे नियोजन जाहीर करण्यात आले असून, जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल ७६ दिवस शाळा बंद राहणार आहेत.

यामध्ये सार्वजनिक सुट्ट्या,सण आणि उन्हाळी सुट्ट्यांचा समावेश आहे.मात्र सुट्ट्यांच्या या वाढत्या संख्येमुळे 'किमान २२० दिवस अध्यापन' होण्याच्या नियमा समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

*अध्यापनाचे वेळापत्रक कोलमडणार?*

शिक्षण विभागाच्या नियमानुसार,विद्यार्थ्यां च्या शैक्षणिक प्रगतीसाठी वर्षात किमान २२० दिवस प्रत्यक्ष अध्यापन होणे आवश्यक आहे.

तथापि,सद्यस्थितीत वर्षातील ३६४ दिवसां पैकी जवळपास १०० दिवस विविध कारणां नी अध्यापन बंद असते.यामध्ये बोर्डाच्या परीक्षा,सत्र परीक्षा,शिष्यवृत्ती परीक्षा आणि सार्वजनिक सुट्ट्यांचा मोठा वाटा आहे.

विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण व्हावा आणि त्यांची बुद्धिमत्ता टिकून राहावी, यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने परीक्षांच्या नियोजनात बदल केला आहे. पूर्वी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात संपणाऱ्या परीक्षा आता १५ एप्रिलनंतर घेतल्या जाणार आहेत.

यामुळे विद्यार्थी एप्रिल अखेरपर्यंत शाळेत उपस्थित राहतील, याची खबरदारी घेतली जात आहे.

*सुट्ट्यांचे सविस्तर वेळापत्रक*

जानेवारी १२ ते १५ जानेवारी (मकर संक्रांत, २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) फेब्रुवारी १९ फेब्रुवारी (छत्रपती शिवाजी महाराज जयंती) मार्च ४ मार्च (धूलिवंदन), २० मार्च (गुढीपाडवा), २१ मार्च (रमजान ईद), २७ मार्च (रामनवमी), ३१ मार्च (महावीर जयंती)
एप्रिल ३ एप्रिल (गुड फ्रायडे), १४ एप्रिल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती) मे व जून १ मे (महाराष्ट्र दिन), १ मे ते १४ जून (उन्हाळी सुट्टी)

*नवीन शैक्षणिक वर्षाचे नियोजन अद्याप कागदावरच*

१ एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या हालचाली शिक्षण विभागात सुरू होत्या.मात्र, सद्यस्थिती पाहता हे नियोजन अद्याप कागदा वरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही १५ जूनपासूनच नव्या शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार आहे.

परीक्षांमुळे आणि सणांमुळे होणारी शैक्षणिक हानी भरून काढण्यासाठी शाळांना अतिरिक्त तासिका किंवा उपक्रम राबवावे लागणार आहेत.
➖➖➖➖➖➖

0
773 views