logo

केंद्रसंचालक व पर्यवेक्षक अदलाबदल,परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सक्ती करण्यात येऊ नये. -- ज्यूक्टो संघटनेची मागणी.*

जळगांव:
आरिफ खान
दिनांक १३/०१/२०२६
आगामी फेब्रु./मार्च २०२६ बोर्ड परीक्षेसाठी केंद्रसंचालक व पर्यवेक्षक यांची अदलाबदल करण्याचे तसेच कॉपीमुक्त परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाचे नियोजन आहे. याबाबत नाशिक बोर्डाकडून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. बोर्डाच्या निर्णयास विरोध म्हणून आज जळगांव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील केंद्र संचालकांच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात (ला.ना.शाळा) नाशिक बोर्डाचे सचिव मा.श्री.मोहनजी देसले साहेब,सहसचिव मा.श्री. मच्छिंद्रजी कदम साहेब यांना निवेदन देताना प्रा.नंदन वळिंकार,प्रा.सुनील सोनार,प्रा.सुनील गरुड ,प्रा. अतुल इंगळे,प्रा.गजानन वंजारी,,प्रा.शैलेश राणे,प्रा.रमाकांत धनगर,श्री.के.टी .तळेले(मुख्याध्यापक)प्रा.संजय पाटील,प्रा.राजेंद्र ठाकरे, प्रा.सुनीता पाटील.यावेळी मा.शिक्षणाधिकारी सो. श्रीमती.कल्पना चव्हाण,सौ.रागिणीताई चव्हाण (उपशिक्षणाधिकारी माध्यमिक),श्री.विजय पवार(गट शिक्षणाधिकारी पाचोरा)व श्री.अजितजी तडवी (गटशिक्षणाधिकारी,जळगांव) देखील उपस्थित होते.

0
205 views