मकर संक्रांति 2026
फल,संक्रांतीचा पुण्यकाल
14 जानेवारी 2026, बुधवारी दुपारी ३:०६ पासून सूर्यास्तापर्यंत आहे.
संक्रांतीचा पुण्यकाल -
तिलमिक्षित उदकाने स्नान, तिळाचे उटणे अंगास लावणे, तिलहोम,
या दिवसाचे कर्तव्य -
तिलतर्पण, तिलभक्षण व तिलदान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो. शके १९४७ पौष कृ. ११, बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी ३:०६ वाजता
सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. बालव करणावर संक्रमण होत असल्याने उक्त असलेले.
वाहनादि प्रकार याप्रमाणे – वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. पिवळे वस्त्र परिधान
कलेले आहे. हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाई घेतलेली असून पायस भक्षण करीत आहे. सर्प जाति असून पुषणार्थ मोती धारण केलेले आहे. वारनांव व नाक्षत्रनांव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त ३० नाहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीच्या पर्वकाळात ात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष-गवत तोडणे, गाई-म्हशींची धार काढणे व कामविषय सेवन ही
कामे करु नयेत. (एकादशीला तिळगूळ खाता येतो.)