
महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यामधील जामखेड तालुक्यात पेन्शन डे साजरा करण्यात आला.
दिनांक सात जानेवारी 2026 रोजी जामखेड तालुका सेवानिवृत्त शिक्षक 'पेन्शनर डे' धडाक्यात साजरा करण्यात आला. वर्ल्ड कल्चर अँड एन्व्हायरमेंट प्रोडक्शन कमिशन नवी दिल्ली व अहिल्यानगर पेन्शनर असोसिएशन शाखा जामखेडच्या संयुक्त विद्यमाने सेवानिवृत्त शिक्षकांचा जीवन गौरव करण्यात आला .यावेळेस त्यांना वर्ल्ड कल्चर अँड एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन कमिशनचे प्रमाणपत्र व अहिल्यानगर पेंशनर शिक्षक संघटनांचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले . गौरविण्यात आले, त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करून आयुष्यभर समाज घडविण्यासाठी आपले जीवन व्यतीत केले. आणि समाजातील कित्येक तरुणांना पायावर उभे केले .डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक,प्राध्यापक, तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी, यांना घडवणारा मूळ शिक्षकच आहे. एवढेच नव्हे तर जगभरातील तज्ञांना सुद्धा घडविण्यात शिक्षकांचा महान वाटा आहे. व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडून शिक्षकांनी मोलाचे कार्य केलेले आहे.म्हणून प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकाचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगण्यात आले . वर्ल्ड कल्चर अँड प्रोटेक्शन कमिशनचे महाराष्ट्रातील सदस्य डॉक्टर संजय गीते यांनी पेन्शनर लोकांची व्यथा मांडून त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला .आणि उपस्थित प्रमुख अतिथी यांच्यासमोर सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या मांडून त्याचे निवारण करण्यासाठी मदत करावी अशी मागणी केली . या कार्यक्रमाला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी हजेरी लावून सेवा निवृत्तांच्या सुख -दुःखा सी समरस झाले .त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या आणि त्या अडचणी सोडवण्यास आम्ही मदत करू असे आश्वासन देऊन सेवानिवृत्तांचे समाधान केले .सेवानिवृत्त यांच्या अनेक समस्या कागदोपत्री पडून आहेत पप्रशासकीय अधिकारी व कर्मचारी लक्ष न घालता ते कामकाज टाळण्याचा प्रयत्न करतात .अशी तक्रार यावेळेस करण्यात आली . सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष पद जिल्हा परिषद माजी सदस्य प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी भूषविले . प्रमुख अतिथी,उपस्थिती डॉक्टर भगवान मुरूमकर. माजी सभापती पंचायत समिती जामखेड व श्री .विजयसिंह गोलेकर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शप गट तसेच ज्योती क्रांती पतसंस्थेचे चेअरमन आजिनाथ हजारे उपस्थित होते . तालुका जामखेड सेवानिवृत्त असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संजय गीते यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये पेन्शनरला आता कोणी वाली उरलेला नसून, एक संघ व एकमताने जामखेड तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त शिक्षकांनी संघटनेला पाठिंबा द्यावा,पाठबळ द्यावे, आपणच आपला वाली व्हावे आणि आपणच आपले कर्ते व्हा, असे आवाहन केले .
प्रशासनाकडे आपल्या कामांचा पाठपुरावा करावा कारण पेन्शनर लोकांच्या समस्या या वर्षानुवर्षे धुळखात पडलेले आहेत .त्याकडे प्रशासकीय कार्यालयात अत्यंत दुर्लक्ष केले जाते . व ती कामे करण्यासाठी टाळाटाळ केली जाते . अशी तक्रार केली .
त्याचबरोबर अहिल्यानगर दक्षिण विभाग प्रमुख पेन्शनर असोसिएशनचे सदस्य श्री थोरात ज्ञानेश्वर यांनी जामखेड तालुका पेंशनर असोसिएशनला पेनर भवन उभे करण्यासाठी जागा नाही . ती उपलब्ध करून द्यावी,असे आवाहन केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक मधुकर राळेभात,माजी जिल्हा परिषद सदस्य, तसेच सर्वच कार्यकर्त्यांनी सदर मागणी पूर्ण करण्याचे वचन दिले .कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व कार्यकर्त्यांनी त्या आवाहनाला प्रतिउत्तर देताना आम्ही तुमची समस्या प्रथम क्रमांकाने मार्गी लावू असे वचन दिले .त्यावेळेस डॉक्टर भगवान मुरूमकर विजयसिंह गोलेकर यांनी आपल्या मागणीचा आम्ही जरूर विचार करू आणि जामखेड मध्ये जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी आम्ही जागा उपलब्ध करून देऊ असे सांगून समाधान केले .
या कार्यक्रमास जामखेड तालुक्यातील पेन्शनर शिक्षकांचा प्रतिसाद मिळाला. अहिल्यानगर असोसिएशन शाखा जामखेडची सर्व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते . माजी केंद्रप्रमुख श्री . सुरेश कुंभार यांनी शिक्षकांच्या व्यथा आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केल्या त्याचप्रमाणे सेवा निवृत शिक्षकांकडे कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे .कारण या वयामध्ये त्यांच्याकडे अत्यंत अक्षम्य अशा पद्धतीने सर्वजण दुर्लक्ष करतात .अशी व्यथा मांडली माजी केंद्रप्रमुख श्री . सूर्यभान चव्हाण यांनी देखील शिक्षकांच्या विविध वेदना, यातना व आपले जीवनानुभव आपल्या भाषणातून व्यक्त केले . माजी विस्ताराधिकारी श्री भानुदास रोडे,श्री नवनाथ सुरवसे, श्री नाथाभाऊ देवकर, सेवानिवृत्त संघटना कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित होते. सरचिटणीस श्री .अंकुश ओमासे कार्याध्यक्ष श्री .पोपट भुते, कोषाध्यक्ष श्री आटकरे डी.जे. उपाध्यक्ष श्री नाथा जावीर, कार्यचिटणीस श्री .मोहन खवळे श्री . ढगे बे .बी . जिल्हा प्रतिनिधी श्री .ज्ञानेश्वर थोरात, श्री हनुमंत गायकवाड प्रसिद्धी प्रमुख श्री बलराम अवसरे संपर्कप्रमुख श्री नारायण कात्रजकर . जेष्ठ मार्गदर्शक श्री दिगंबर थोरात श्री रघुनाथ जगदाळे . श्री दशरथ हजारे श्री कार्ले प्र . सर्वांच्या प्रयत्नाने पेन्शनर डे कार्यक्रम संपन्न झाला. शेवटी ज्यांच्यासाठी प्रामुख्याने साजरा केला जातो ते थोर दिवंगत पेन्शनर नेते डीएस नकारा यांना भावांजली अर्पण करून कार्यक्रम संपन्न करण्यात आला .