logo

आमदार समाधान अवताडे यांची आंबे ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट

पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील ग्रामपंचायत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी स्थानिक ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी आमदार समाधान आवताडे यांचासन्मान-सत्काराचा केला. यासोबतच निसर्ग राजा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था यांच्या दिनदर्शिकेचे लोकार्पण करण्यात आले. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात आर्थिक सक्षमतेचे काम सुरू असल्याचे समाधान यावेळी व्यक्त केले.
यावेळी सरकोली ते रांजणी पेंडिंग रस्त्याच्या कामाला लवकरात लवकर सुरू करून ते संपवावे अशा सूचना अधिकारी वर्गांना देण्यात आल्या.
यावेळी ग्राहक समितीचे प्रदेश सचिवअन्सार शेख ,सहकार शिरोमणीचे संचालक श्री. अण्णा मामा शिंदे, सरपंच श्री. तानाजी सावंत, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री. सग़न शेख, चेअरमन श्री. अतुल शिंदे, अध्यक्ष श्री. नितीन शिंदे, श्री. बाळासाहेब शिंदे, श्री. विष्णू शिंदे सर, श्री. आंसर शेख, माजी सरपंच श्री. अर्जुन कोळी, सदस्य श्री. गणेश कांबळे, श्री. अशोक शिंदे तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

#पंढरपूर #Pandharpur #आंबे #दिनदर्शिका #प्रकाशन

9
661 views