logo

गुहागर हायस्कूलमध्ये विधी सेवा समितीच्यावतीने मार्गदर्शन शिबिर

प्रतिनिधी. अनिकेत मेस्त्री

[ गुहागर | १२ जानेवारी २०२६ ]

✍️ अनिकेत मेस्त्री

स्वामी विवेकानंद यांच्या १६३व्या जयंतीनिमित्त गुहागर येथील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरात दिवाणी न्यायालय (क) स्तर, गुहागर येथील विधी सेवा समितीच्या वतीने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात गुहागर येथील वकील सुप्रिया सुरेश वाघधरे यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्याची ओळख करून दिली. युवकांकडून असलेल्या अपेक्षा स्पष्ट करत त्यांनी शालेय जीवनातच स्वतःसाठी ठोस ध्येय निश्चित करून त्या ध्येयाच्या दिशेने सातत्याने कसा पाठपुरावा करावा, याविषयी सखोल मार्गदर्शन केले. स्वतःच्या जीवनातील अनुभव सांगत निश्चित ध्येय ठेवल्यास कोणतेही स्वप्न साकार करता येते, असे त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी उदाहरणासह सांगितले.

यावेळी पंचायत समितीचे किरण शिंदे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत नागरिक शिष्टाचाराचे महत्त्व स्पष्ट केले. समाजातील जबाबदार नागरिक म्हणून वागण्यासाठी शिस्त, कर्तव्यभावना आणि कायद्याची जाणीव किती आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला.

सदर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दिवाणी न्यायालय (क) स्तर, गुहागर येथील विधी सेवा समितीच्या वतीने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

➖➖➖➖➖➖

1
693 views