logo

पुणे महानगरपालिका निवडणुकीमुळे १५ जानेवारी रोजी गुलटेकडी मार्केट यार्ड व उपबाजार बंद

पुणे, दि. १२ जानेवारी २०२६ :
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका गुरुवारी, १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केला आहे. नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या निवडणुकीअंतर्गत पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्ड तसेच सर्व उपबाजारांतील व्यवहार पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे या दिवशी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजारात आणू नये तसेच ग्राहकांनी खरेदीसाठी येऊ नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप यांनी केले आहे.

11
266 views