logo

बल्लारपूर नगर परिषदेच्या उपाध्यक्ष म्हणून देवेंद्र उर्फ पापा आर्य यांच्या सह चार स्वीकृत नगरसेवकांची निवड

रोहन कळसकर ( मुख्य संपादक)

बल्लारपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी नगर परिषद तसेच मिनी इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बल्लारपूर शहराच्या 2 डिसेंबर ला नगर परिषदेची निवडणूक व 21 डिसेंबर ला लागलेल्या निकाला नुसार काँग्रेस पक्षाचे 17, भाजपचे 7 शिवसेना(उबाठा) 5 राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) 3 शिवसेना(शिंदे) 1, अपक्ष 1 असे बल्लारपूरात 34 नगरसेवक निवडून आले त्यानुसार बल्लारपूर नगर परिषदेत 4 स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करण्यासाठी आज बल्लारपूर शहरातील गोंडराजे नाट्य गृहात बल्लारपूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर सभा सौ. अल्काताई वाढई नगराध्यक्ष बल्लारपूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सभेत बल्लारपूर नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदी काँग्रेसचे देवेंद्र आर्य यांची निवड करण्यात आली तर स्वीकृत सदस्य म्हणून काँग्रेस पक्षातर्फे श्री. भास्कर माकोडे, डॉ. सुनिल कुल्दीवार, भारतीय जनता पार्टीचे श्री. हरीश शर्मा, तर शिवसेना (उबाठा) तर्फे श्री. घनश्याम मुलचंदानी यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली या सभेला श्री. विशाल वाघ, मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर, नगरसेवक यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्याची उपस्थिती होती.

10
1238 views