
डोनगांव/प्रतिनिधि/सद्दाम खान ..
डोनगांव :
डोनगांव ग्राम पंचायत द्वारा गांव में आवारा कुत्तों की बढ़ती समस्या को नियंत्रित करने के लिए एक विशेष अभियान चलाया जा रहा है। पिछले कुछ दिनों से आवारा कुत्तों की संख्या में वृद्धि होने से नागरिकों को परेशानी का सामना करना पड़ रहा है, जिससे बच्चों, महिलाओं और वरिष्ठ नागरिकों की सुरक्षा को लेकर चिंताएं बढ़ गई हैं। ग्रामपंचायतीच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सरपंच चरण पाटील आखाडे, उपसरपंच शामा इंगळे, शैलेश भाऊ सावजी, तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. कुत्रे पकडण्याची प्रक्रिया ही नियम व मार्गदर्शक सूचनांनुसार केली जात असून, प्राणीप्रेमाचा विचार ठेवत योग्य पद्धतीने कारवाई केली जात आहे.
गावातील मुख्य रस्ते, वस्ती परिसर व सार्वजनिक ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करून ही मोहीम राबवली जात आहे. नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन पुढील काही दिवस ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.
गावात स्वच्छता, सुरक्षितता व शांतता राखण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध असून, या मोहिमेसाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.