तरुणाची घराच्या वरच्या मजल्यावर आत्महत्या
जळगाव : आई वडील खालच्या घरातअसताना वरच्या मजल्यावर ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत मोहीत अशोक चौधरी (२१, रा. मयूर कॉलनी, पिंप्राळा) या डिप्लोमाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ही घटना रविवारी (११ जानेवारी) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.मयूर कॉलनीतील मोहीत पाटील हा रविवारी घरी होता. त्याचे आई वडील खालच्या घरात असताना तो वरील मजल्यावर गेला व ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्यावेळी वरच्या मजल्यावर स्टूल पडल्याचा जोरात आवाज आल्याने मोहीतचे वडील तिकडे गेले. यावेळी त्यांना मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी लगेच मुलाला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.तरुणाच्या ऑत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मोहीत हा अतिशय शांत आणि मनमिळावू स्वभावाचा होता. त्याच्या अचानक मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.