logo

नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत मुस्लिम उमेदवारांचा बाेलबाला


---
४९१ पैकी तब्बल १६९ मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
---
शिवसेना (शिंदे गट), भाजप, उबाठा सेनेने दिले मुस्लिम उमेदवार
---

नांदेड : - नांदेड - वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुस्लिम उमेदवारांचा बाेलबाला दिसत असून, निवडणुकीत उतरलेल्या एकुण ४९१ उमेदवारां पैकी १६९ मुस्लिम उमेदवार निवडणुकीत स्वतःच नशिब आजमवत आहेत.जवळपास सर्वच प्रमुख पक्षांनी मुस्लिमांना उमेदवारी बहाल केली आहे. टक्केवारीत पाहिले तर एकूण ४९१ पैकी तब्बल ३५ टक्के उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्यात आला आहे. वेगवेगळ्या विषयांवरुन ही निवडणुक गाजत आहेत. आराेप प्रत्याराेपांच्या फैरीतून राजकीय वातावरण तापले आहे. लाेकशाहीत प्रत्येकाला निवडणुक लढविण्याचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळे विविध जातीधर्मांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यात उल्लेखनिय बाब म्हणजे नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत ४९१ उमेदवारां पैकी तब्बल १६९ उमेदवार हे मुस्लिम समाजातील आहेत.
२० प्रभागांतून ८१ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. त्यात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांमध्ये दाेन तीन प्रभाग वगळता सर्वच प्रभागात मुस्लिम उमेदवार नशिब आजमावत आहेत. काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस, एमआयएम,समाजवादी पक्ष, वंचित आघाडी या सारख्या पक्षांनी तर मुस्लिम उमेदवार दिले मात्र, हिंदुत्वादी पक्ष म्हणून शिक्का बसलेल्या भाजप ने - तीन, शिवसेना (शिंदे गट) ने चार, उबाठा सेनेने सात उमेदवार मुस्लिम उमेदवार दिले आहेत.

प्रमुख पक्षां बराेबरच १४ प्रादेशिक पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहेत.त्यात बहुतांश ठिकाणी मुस्लिम उमेदवार देण्यात आले आहेत. शिवाय अपक्ष म्हणून ही मुस्लिम उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे नांदेड महापालिकेच्या २०२५ -२०२६ च्या निवडणुकीत नांदेडची जनता किती मुस्लिम उमेदवार नांदेड महापालिकेच्या सभागृहात पाठवणार या बाबत राजकीय विश्लेषकांत चर्चेचा विषय ठरला आहे.
---
भाजपचा सावध पवित्रा
नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने ८१ पैकी केवळ ६७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. भाजपची मित्रपक्षा साेबत युती नसल्याने ज्या भाजपने ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी आहे. त्या ठिकाणी उमेदवार उभेच केले नाहीत. प्रभाग क्रमांक १८ मध्ये तर एकही उमेदवार भाजपने दिले नाहीत. भाजपने केवळ तीन मुस्लिमांना तिकीट दिले आहे.भाजपने बिलाेली व धर्माबाद प्रमाणे नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत मजपाचा प्रयाेगही काही प्रभागात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असल्याने.एकुणच नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने सावध पवित्रा घेतल्याचे दिसते.

0
0 views