logo

अतिक्रमणामुळे शिंदीच्या उपसरपंचांचे सदस्यत्व रद्द



जळगाव :

भडगाव तालुक्यातील शिंदी ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी उपसरपंच वर्षा मधुकर पाटील यांना ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र ठरविण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी २ जानेवारी २०२६ रोजी दिला आहे. या संदर्भात दाखल तक्रारीवर त्यांच्यासमोर सुनावणी झाली होती.


जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात कृष्णा पाटील यांनी तक्रार दाखल केली होती. उपसरपंच वर्षा पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या जागेवर पत्री गोदाम बांधले होते. त्याचा त्या वापर करत होत्या. तक्रारीनंतर अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली होती. सुनावणी अंती उपसरपंच वर्षा मधुकर पाटील यांना ग्रामपंचायत सदस्य / उपसरपंच पदावरून अपात्र ठरविण्याचा आदेश दि. २ जानेवारीला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

58
1418 views