logo

आज दिवा येथील साभेगावातील कोकणरत्न परिसर, जीवदानी नगर येथील प्रभाग क्रमांक 29 मध्ये कल्याण

आज दिवा येथील साभेगावातील कोकणरत्न परिसर, जीवदानी नगर येथील प्रभाग क्रमांक 29 मध्ये कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. राजेशजी गोवर्धन मोरे साहेब यांनी शिवसेना महायुतीच्या उमेदवारांचा घरोघरी जाऊन प्रचार केला. यावेळी या प्रभागातील नागरिकांशी संवाद साधत शिवसेना महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

दरम्यान प्रभाग क्रमांक 29 अ मधून अर्चना निलेश पाटील, प्रभाग क्रमांक 29 ब मधून वेदिका साहिल पाटील, प्रभाग क्रमांक 29 क मधून बाबाजी पाटील हे उमेदवार निवडणूक लढवत असून या सर्वांच्या विजयाचा निर्धार करत मतदारांप्रति विश्वास व्यक्त केला.

यावेळी भालचंद भगत, निलेश पाटील, सुनील पवार आणि शिवसैनिक उपस्थित होते.

16
66 views