logo

निवडणूक प्रचारात भोंग्यांच्या रिक्षांचा सुळसुळाट; ध्वनीप्रदूषणामुळे पुणेकर हैराण

पुणे :
पुणे महानगरपालिकेची निवडणूक सध्या अंतिम टप्प्यात असून, प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांकडून भोंगे लावलेल्या रिक्षा शहरभर फिरताना दिसत आहेत. मात्र या प्रचारामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषणाचा सामना करावा लागत आहे.

दिवसभर वस्ती भाग, मुख्य चौक तसेच अंतर्गत रस्त्यांवरून मोठ्या आवाजात घोषणा दिल्या जात असल्याने नागरिकांची शांतता भंग होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी तसेच रुग्णांना याचा अधिक त्रास होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाने ध्वनीमर्यादांचे स्पष्ट नियम असतानाही अनेक ठिकाणी त्यांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. प्रशासन व पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

18
1123 views