लाच देण्याचा प्रयत्न, उपअभियंत्याला बेड्या
पैशांचा लिफाफा देऊन प्रलोभनाचा केला प्रयत्नपांढरकवडा (यवतमाळ) : काम करून घेण्यासाठी चक्क कार्यालयातच लाच देण्याचा प्रयत्न केल्याची घटना पांढरकवडा येथे गुरुवारी घडली. याप्रकरणी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अमित रंजन यांच्या तक्रारीवरून सिंचन विभागाचे उपअभियंता त्रिलोक त्रिपाठी आणि खासगी कंपनीचा इंजिनिअर कामेश डुल्ला या दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आली.सहायक जिल्हाधिकारी रंजन यांच्या कार्यालयात गुरुवारी दुपारी त्रिपाठी आणि डुल्ला हे आले होते... यावेळी त्यांनी रंजन यांना एक पाकिट देत हे पैसे कार्यकारी अभियंता बनसोड यांनी तुम्हाला देण्यासाठी सांगितले आहेत, असे सांगितले.कार्यालयातच लाच दिल्याचे सीसीटीव्हीत कैदहा सर्व प्रकार कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. आपल्या कामात हस्तक्षेप करून प्रभाव पाडण्याचा प्रयत्न झाल्याचे लक्षात येताच, रंजन यांनी तातडीने पोलिसांना फोन करून संबंधिताविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले.रात्री उशिरा अमित रंजन यांनी लेखी तक्रार दिल्यानंतर पांढरकवडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम आठ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला.