logo

अकोल्याचे जवान वैभव लहाने यांना देशसेवेत कर्तव्य बजावत असताना अकोला जिल्ह्यातील सेवारत सैनिक नायक वैभव श्रीकृष्ण लहाने यांना वीरमरण

अकोल्याचे जवान वैभव लहाने यांना वीरमरण*
अकोला, दि. ८ : देशसेवेत कर्तव्य बजावत असताना अकोला जिल्ह्यातील सेवारत सैनिक नायक वैभव श्रीकृष्ण लहाने यांना वीरमरण आले. ते १२ मराठा लाइट इन्फंट्री या युनिटमध्ये कार्यरत होते.
शहिद लहाने हे जम्मू काश्मिरमध्ये कुपवाडा सेक्टरमध्ये कार्यरत होते. दि. ७ जानेवारी २०२६ रोजी ते शहीद झाले. त्यांचे मूळ गाव कपिलेश्वर (पो. वडद, ता. अकोला) असून, त्यांचे पार्थिव ९ जानेवारी रोजी दु. १ पर्यंत कपिलेश्वर येथे पोहोचेल. तिथे त्यांना मानवंदना देऊन अंतिम संस्कार केले जातील, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे देण्यात आली.
भावपूर्ण सर्द्धांजली 🙏🙏💐💐
०००

7
322 views