logo

महाराष्ट्र सदनात आयोजित मकरसंक्रांती महोत्सव व हुरडा पार्टीचे उद्घाटन अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते झाले.

📍 नवी दिल्ली
येथील महाराष्ट्र सदनात आयोजित मकरसंक्रांती महोत्सव व हुरडा पार्टीचे उद्घाटन अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते झाले. एक कलाकार म्हणून कलेविषयी आणि आपल्या संस्कृतीविषयी बोलताना मिळणारा आनंद हा शब्दांत व्यक्त न करण्याजोगा असतो. महाराष्ट्र सदनात पहिल्यांदाच असा अनुभव घेताना मला मनापासून समाधान वाटत आहे. दिल्लीसारख्या महानगरात, जिथे विविध प्रांतांचे लोक येतात, तिथे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीची चव पोहोचवणे हे अभिमानास्पद कार्य आहे, अशा शब्दांत लोकप्रिय अभिनेते भरत जाधव यांनी दिल्लीतील मराठी उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी व्यासपीठावर निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला, निवासी आयुक्त गुंतवणूक सुशील गायकवाड, माहिती संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे उपस्थित होते.

0
385 views