logo

महात्मा फुले हायस्कूल येथे सत्यशोधिका फातिमाबी शेख जन्मोत्सव साजरा !... भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख : पी डी पाटील

धरणगांव - शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख एस एन कोळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक एस व्ही आढावे होते.
मान्यवरांच्या हस्ते माता फातिमाबी शेख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेतील उपशिक्षक पी डी पाटील यांनी फातिमाबी शेख व ज्ञानज्योती सावित्रीमाई या दोन्ही महामातांचे शैक्षणिक - सामाजिक कार्य विशद केले. शाळेतील १० वी ची विद्यार्थिनी भावना चंडाले हिच्या जन्मदिनानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष एस व्ही आढावे यांनी या महामतांचे कार्य प्रेरणादायी आहे यांच्या विचारांवर चालले पाहिजे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एस एन कोळी तर आभार एच डी माळी यांनी मानले.

0
77 views