logo

पिंपळे गुरव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला मुस्लिम बांधवांचा जाहीर पाठिंबा

पिंपळे गुरव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला मुस्लिम बांधवांचा जाहीर पाठिंबा
पिंपरी चिंचवड: मुख्य संपादक उमेश पाटील 8530664576
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार जवळकर तानाजी दत्तात्रय यांच्या विजयासाठी मुस्लिम बांधवांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. विकास, शांतता आणि सर्वसमावेशक राजकारणाला प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी डोळस कुंदा गौतम, सुनीता दिशांत कोळप, लोखंडे राजू मामा आणि तानाजी जवळकर यांनी “आम्ही सर्व एकत्र आहोत” अशी भूमिका स्पष्ट करत, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाचा मार्ग प्रशस्त करण्याचा संकल्प व्यक्त केला. मुस्लिम बांधवांनीही जनतेच्या प्रश्नांसाठी झटणाऱ्या, विश्वासार्ह आणि विकासाभिमुख नेतृत्वालाच पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले.
परिसरातील मूलभूत सुविधा, नागरी समस्या, युवकांचे प्रश्न आणि सामाजिक सलोखा जपण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण स्पष्ट असल्यानेच हा पाठिंबा मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. विविध समाजघटकांच्या या एकजुटीमुळे येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मोठे बळ मिळणार असल्याची चर्चा आहे.

3
247 views