logo

मुंबईत मराठी महापौरच होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चेन्नईत जसा तमिळ महापौर होतो तसा मुंबईत मराठी महापौरच होणार आहे. ज्यांच्या अंगात छत्रपती शिवरायांचे रक्त आहे आणि जे त्यांच्या विचारांवर चालतात ते सर्व मराठी आहेत असे सांगतानाच बाहेरून आलेले पण इथे स्थायिक झालेले लोक मुंबईकरच आहेत मग त्यांची भाषा हिंदी असो हेही स्पष्ट केले. आपण सर्व हिंदू म्हणून एक आहोत आणि हिंदुत्व हाच आमचा आत्मा आहे अशा शब्दांत महानगरपालिका निवडणुकीनंतरचे धोरण जाहीर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलले.मुंबईच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की आम्ही घरांची डिलिव्हरी सुरू केली असून नवीन डेव्हलपर्सना संधी दिल्या आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की येत्या सात ते आठ वर्षांत मुंबई पूर्णपणे झोपडपट्टीमुक्त होईल. पाणी तुंबण्याच्या समस्येवर उपाय म्हणून १०० टक्के पंपिंग स्टेशन्सचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी मेट्रो प्रकल्पात योगदान देण्यास नकार दिला होता तेव्हा आम्ही एमएमआरडीएच्या माध्यमातून कामे पूर्ण केली असून एमएमआरडीएने बीएमसीच्या कोणत्याही अधिकारावर गदा आणलेली नाही उलट मुंबईचे इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत केले आहे आणि कोणतेही अतिक्रमण केलेले नाही. एकूणच बीएमसीचे अधिकार संपवण्याच्या आरोपाला पूर्णविराम दिला.अवैध घुसखोरांच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की आम्ही केवळ बोलत नाही तर कृती करतो आणि बांगलादेशी घुसखोरांना डिपोर्ट करण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. येणाऱ्या काळात एकाही बांगलादेशी घुसखोराला मुंबईत राहू देणार नाही त्यांना वेचून बाहेर काढू असा इशाराही त्यांनी दिला.

12
1299 views