logo

आदर्श गाव देऊळवाडी येथे बाबुराव केंद्रे यांच्या घरातून २० शेळ्यांची चोरी

आदर्श गाव देऊळवाडी येथे बाबुराव केंद्रे यांच्या घरातून २० शेळ्यांची चोरी
देऊळवाडी (ता. उदगीर )— आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या देऊळवाडी येथे शेतकरी बाबुराव केंद्रे यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल २० शेळ्यांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
बाबुराव केंद्रे हे आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी शेळीपालन व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे त्यांनी शेळ्या रात्री घरालगतच ठेवल्या होत्या. मात्र पहाटे उठल्यानंतर शेळ्या घरातूनच गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरीस गेलेल्या २० शेळ्यांमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी बाबुराव केंद्रे यांच्या घरी भेट दिली. मात्र या प्रकरणी अद्याप पोलिसात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नसून, पुढील निर्णय घेण्यासाठी केंद्रे कुटुंब ग्रामस्थांशी चर्चा करत असल्याची माहिती आहे.
आदर्श गावात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून, भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी रात्रीची दक्षता वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

332
8471 views