logo

गर्दीत महिलेची सोनपोत लंपास बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने साधला डाव


जळगाव : शहरातील नवीन बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या गळ्यातील सुमारे ९१ हजार ७७७ रुपये किमतीची सोन्याची माळ अज्ञात चोरट्याने हातोहात लांबवल्याची घटना ६ जानेवारी, मंगळवारी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. त्यांनी तातडीने बस चालक आणि वाहकाला या घटनेची माहिती दिली. प्रसंगावधान राखून चालकाने बस थेट जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेली.

जामनेर येथील रहिवासी प्रियंका कैलास पाटील (वय ४०) या मंगळवारी आपल्या आई-वडिलांसोबत जळगाव येथे सोने खरेदीसाठी आल्या होत्या. दिवसभर सोने खरेदीचे काम आटोपल्यानंतर, संध्याकाळी ४.३० वाजता त्या घरी जाण्यासाठी नवीन बसस्थानकावर पोहोचल्या.

संध्याकाळी ५.२० च्या सुमारास 3 जळगाव-जामनेर (एम. एच. १४-बीटी-१९५२) ही बस लागली. बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. प्रियंका पाटील बसमध्ये चढत असताना, गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १९:९६० ग्रॅम वजनाची सोन्याची माळ शिताफीने तोडून चोरून नेली.

53
1695 views