logo

वाशी रेल्वेस्धानक परिसर परिक्षणापासून दुर्लक्षित..का..??

नवी मुंबई वाशी सेक्टर ३१ ए रेल्वेस्धानका समोरील परिसर किऑस्क अर्थात खाऊ गल्ली आणि सुशोभित बेटांची देखभाल दुरुती नवी मुंबई महापालिका आणि रेल्वे आणि सिडकोच्या श्रेयवादासह महसूली उत्पन्न वाटाघाटीत अडकून पडल्याने वेळोवेळी दुरुस्ती केली जात नाही. सदर ठिकाण सद्यस्थितीत गरर्दुले आणि प्रेमीयुगुलांचा अड्डा तयार झाला असल्याने याचा मनस्ताप करदात्या नागरिकांना नाहक सहन करावा लागत असल्याचे विदारक सत्य अधोरेखित झाले आहे. तरी रेल्वे पालिका आणि सिडको या यंत्रणा समन्वय साधून या दुरुस्तीकामांवर जाणीवपूर्वक लक्ष देऊन योग्य कारवाई करतील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

0
0 views