logo

साकोली येथे नेफडो च्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, शाखा साकोली (जि. भंडारा) यांच्या वतीने थोर समाजसुधारिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती करंजेकर महाविद्यालय, साकोली येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याच कार्यक्रमात नेफडोचे भंडारा जिल्हा उपाध्यक्ष डी. जी. रंगारी यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेफडोचे विभागीय उपाध्यक्ष यशवंत उपरीकर होते. प्रमुख उपस्थितीत भंडारा जिल्हा उपाध्यक्ष डी. जी. रंगारी, नेफडो भंडारा जिल्हा सल्लागार डॉ. जितेंद्र कुमार ठाकूर, संघटक के. एस. रंगारी, गुडमार्निंग ग्रुपचे अध्यक्ष दिवाकर रामटेके सर, तसेच नेफडो व गुडमार्निंग ग्रुपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत शिक्षण, स्त्री-सशक्तीकरण व सामाजिक समतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. समाजाने त्यांच्या विचारांचा अंगीकार करून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी, असे प्रतिपादन वक्त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी डी. जी. रंगारी यांचा वाढदिवस केक कापून व शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

17
1656 views