logo

राजीव गांधी तंत्रनिकेतन मध्ये उदगीर अभाविप तर्फ Dipex talk कार्यक्रमाचे आयोजन

युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचे स्टार्टअप सुरू करावे: सागर महाजन
उदगीर ( विशेष प्रतिनिधी )
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दरवर्षी राज्यस्तरीय ‘DIPEX (Project Exhibition)’ या नावाने प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करते. यावर्षी हा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योगपती, शिक्षणतज्ज्ञ व समाजाशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जाणार आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योगजगत यांमधील दरी कमी करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही देशातील अग्रगण्य विद्यार्थी संघटना असून गेल्या ७७ वर्षांपासून शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधावा या उद्देशाने अभाविपतर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत.
या पार्श्वभूमीवर, राजीव गांधी तंत्रनिकेतन महाविद्यालय, उदगीर येथे अभाविप तर्फे ‘DIPEX Talk’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उदगीर येथील सुप्रसिद्ध नारायणा ऍग्रो ऑईल्सचे व्यवस्थापकीय संचालक सागर महाजन हे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योग, नवोपक्रम, स्टार्टअप, भविष्यातील संधी तसेच करिअर बद्दलचे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बोलत असताना त्यांनी विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता उच्च शिक्षणानंतर स्वतः उद्योजक होऊन इतरांना रोजगार देणारे बनावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमास अभाविप लातूर विभाग संघटन मंत्री महेश भवर यांनी अभाविपची भूमिका व DIPEX उपक्रमाची सविस्तर मांडणी केली.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश जाधव सर उपस्थित होते त्यांनी अभाविपच्या या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांसाठी अशा मार्गदर्शक कार्यक्रमांची गरज अधोरेखित केली.
अभाविपतर्फे राबविण्यात आलेला ‘DIPEX Talk’ हा उपक्रम विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षणाकडे वळवणारा आणि त्यांच्या भविष्यातील करिअरला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी अभाविप उदगीर शहर मंत्री सुमित लाल उपस्थीत होते.
Dipex Talk या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

6
1738 views