logo

लातूर च्या विकासासाठी महानगरपालीका भाजपा च्या ताब्यात द्या . मुख्यमंत्री देवेन्द्र फडणविस .

लातूर (महाराष्ट्र ) विशेष प्रतिनिधी - दि .7
लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या भव्य सभेचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. यानिमित्त मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस लातूर विमानतळावर आले असता, भाजपा जिल्हाध्यक्ष बस्वराज पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यानंतर मा.मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आयोजित भव्य विजयी संकल्प सभेला संबोधित केले. या सभेतून त्यांनी लातूरच्या सर्वांगीण विकासाबाबत सखोल, दिशादर्शक व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. भारतीय जनता पक्षाच्या महायुती सरकारने आतापर्यंत लातूरच्या विकासासाठी राबवलेल्या विविध योजना, पायाभूत सुविधा आणि लोकहिताच्या निर्णयांचा सविस्तर आढावा त्यांनी उपस्थितांसमोर मांडला. तसेच विकसित, सक्षम व प्रगत लातूर घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील योजना जनते पर्यन्त पोहंचव्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी लातूरकरांना केले.
या भव्य सभेस पालकमंत्री तथा लातूर जिल्हा निवडणूक प्रभारी श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले, निवडणूक प्रमुख आमदार श्री. संभाजी पाटील निलंगेकर, आमदार श्री. रमेश कराड, आमदार श्री. अभिमन्यू पवार, माजी खा. सुधाकर श्रंगारे,सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, माजी खासदार सुनिल गायकवाड, माजी आमदार गोविंद केंद्रे, म माजी आ. पाशा पटेल,माजी आमदार बब्रूवान खंदाडे, माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर, अहमदपूर चे नगराध्यक्ष स्वप्नील व्हते, पाटील निलंगेकर, शैलेष लाहोटी, माजी जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख, गुरुनाथ मगे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार, लोक प्रतिनिधी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व लातूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार शैलेश गोजमगुंडे यांनी केले .

38
1137 views