logo

जि,प,प्रशाला मुलांची पैठण येथे बाल आनंद नगरीचे आयोजन


पैठण प्रतिनिधि:सब्दर शेख
छञपती संभाजीनगर जिल्हयाचे जिल्हाधिकारी मा.दिलीप स्वामी, यांच्या संकल्पनेतील दशसुत्री अभियान रुजवण्यासाठी मुख्य कार्यकारीअधिकारी अंकित व कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण,तसेच पैठण पंचायत समितीचे तडफदार गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली,
विद्यार्थ्यांच्या गणितीय संकल्पना प्रात्यक्षिक तसेच सामाजिक विकासासाठी बाल आनंद नगरी चे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी विद्यार्थ्यांकडून विविध स्वरूपाचे 32 स्टॉल लावले होते ज्यामध्ये वडापाव,पोहा,हिरवा चणा,पाणी पुरी,साबुदाणा वडा चना मसाला असे विविध प्रकार बनून आणले होते.

कार्यक्रमाच्या प्रस्तावनेतून समशेर पठाण यांनी नगरसेवक यांना निवडून आल्या बद्दल शुभेच्छा दिल्या व त्यांच्या समोर शाळेसाठी आवश्यक सेवा सुविधेची व मैदान लेव्हलची मागणी केली असता स्वखर्चातून मैदानची लेवल व स्वच्छ करून देण्याचे यावेळी नगरसेवक गौरव आठवले व नगरसेवक इम्रान पठाण यांनी आश्वासीत केले.

यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून नगरसेवक गौरव आठवले व नगरसेवक इम्रान पठाण होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राजू सेठ सोनारे,मा.मुख्याध्यापक जालिंदर फलके,मुख्याध्यापक बाळू पाखरे,मुख्याध्यापक रामदास घुगे होते.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर वाडेकर होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ताराचंद हिवराळे,फैय्याज शेख दिलीप तांगडे,शेषराव गरजे, जयाजी गटकळ,नाशेर शेख, वैशाली कुटे,सय्यद शबाना,नेहा सय्यद,रेखा पाखरे,रेखा व्हरकटे, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

39
7595 views