logo

सावित्री जिजाऊ रमाई नाटक सादर करणाऱ्या गायत्री रामटेके यांचा फुले एज्यू.ने केला सत्कार

सावित्रीजिजाऊरमाई नाटक सादर करणाऱ्या चंद्रपूरच्या गायत्री रामटेके यांचा फुले एज्युकेशनने केला सन्मान !!!

पुणे /वडगांव – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केद्रातर्फे दि.5.1.2026 रोजी सकळी ९ वाजता साऊ जिजाऊ यांच्या सयुक्त जयंती निमित्ताने चंद्रपूर ,बल्लापूर शहराचे एकपात्री कलाकार सौ.गायत्री रामटेके व त्यांचे पती यांचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ चे वतीने सन्मानपत्र थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची एकत्रित फोटोफ्रेम आणि जिजाऊ सावित्रीमाई यांचे ग्रंथ तसेच पती पत्नीच्या अंगावर एकत्रित शाल पांघरून मोफत सावित्रीजिजाऊरमाई नाटक महाराष्ट्राभर सादर करीत असल्याने सत्यशोधक रघुनाथ व आशा ढोक यांनी गौरवपूर्वक सन्मान केला.
यावेळी कार्यक्रमाचे सुरुवातीला सौ.गायत्री आणि अनिलकुमार रामटेके यांचे शुभहस्ते थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महात्मा फुले रचित सत्याचा अखंड आणि भारतीय उद्देशिकाचे वाचन करण्यात आले.
सत्कारास उत्तर देताना सौ.गायत्री म्हणाले की माझा व पतीचा आज या बहुउद्देशीय सत्यशोधक केद्राने पुणे सांस्कृतिक शहरात जो सन्मान केला त्याबद्दल आभार मानावे तेवढे कमीच आहे. माझे हातून फुले दाम्प्त्याचे तसेच जिजाऊ रमाई च्या त्यागाची कहाणी जनतेला वाचन संस्कृती कमी झाल्याने नाटक स्वरुपात सांगून प्रबोधन करण्याची या सन्मानानाने जबाबदारी वाढली आहे. आपल्या संस्थेसारखी इतर समाज मंडळे देखील या कार्यात मदत करीत आहेत.लवकरच मी या महान क्रांतिकारी महिलांचा इतिहास लंडन देशातदेखील सादर करणार आहे त्यासाठी आपणासर्वांचा आशीर्वाद ,शुभेच्या मिळाव्यात असे देखील म्हंटले.
याप्रसंगी ढोक म्हणाले की सावित्रीजिजाऊरमाई चा इतिहास खूप त्यागाचा आहे त्यामुळेच शिवाजी महाराज घडले आणि महात्मा फुले यांच्या संपूर्ण कार्यात बरोबरीने सावत्रीमाईनी साथ दिली म्हणूनच महिलांना शिक्षणाचे अमृत मिळाले त्याचप्रमाणे रमाईच्या त्यागाने डॉ.आंबेडकर अति उच्च शिक्षित बनले म्हणूनच ते भारताला स्री पुरुष समानतेचे समान अधिकार असणारे व मानवता धर्म पाळीत समता न्याय बंधुता समान असावी असे धर्मनिरपेक्ष भारतीय संविधान देऊ शकले अशा महान महिलांचा अजरामर इतिहास रामटेके ताई आपण लवकरच लंडन मध्ये सादर कराल अशी आशा आहेच सोबत आपण हे नाटक हिंदीत पण केले तर इतर राज्यात पण सादर करण्यास आमची संस्था आपणास पूर्ण सहकार्य करेल असे देखील ढोक म्हणाले.
कार्यक्रमाचे आयोजन आकाश व आभार शितीज ढोक यांनी मानले.

0
0 views