logo

अनिल किरणापुरे यांना राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्काराने गौरव

समाजातील शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साकोली तालुक्यातील मु.लवारी येथील युवा शेतकरी अनिल शिवलाल गिरणापुरे यांना राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

देवरी येथील धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट सभागृहात श्याम महाजन बहुउद्देशीय विकास संस्था, शेडेपार, धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट देवरी व देवरी तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार आ. सहसराम कोरटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुकेश्वरी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत संगीडवार होते. प्रमुख उपस्थितीत उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील, संस्थेचे सचिव डॉ. घनश्याम निखाडे, नगरपंचायत अध्यक्ष संजू उईके, उपाध्यक्ष प्रज्ञा संगीडवार श्रीमती विजया निखाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अनिल किरणापुरे यांनी आधुनिक शेती पद्धती, नाविन्यपूर्ण प्रयोग, सातत्यपूर्ण मेहनत व शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी कार्य केल्याबद्दल त्यांची राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, श्रीफळ व प्रमाणपत्र असे होते.

या सोहळ्यात समाजाच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १३ मान्यवरांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना प्रेरणा देणारा ठरला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

31
2561 views