logo

जनकल्याण समाज उन्नती पत्रकार संघटनेतर्फे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी


जनकल्याण समाज उन्नती पत्रकार संघटनेच्या वतीने मराठी पत्रकारितेचे जनक, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
दि. ६ जानेवारी २०२६ रोजी आशिर्वाद मंगल कार्यालय, सवणा फाटा, चिखली येथे आयोजित कार्यक्रमात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार व पुष्प अर्पण करत अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद पवार यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. मराठी पत्रकारितेच्या जडणघडणीत त्यांचे अमूल्य योगदान, समाजप्रबोधनासाठी केलेले कार्य आणि पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विजय जगदीश जयस्वाल हे उपस्थित होते.
हा कार्यक्रम तालुकाध्यक्ष शे. कदीर शे. शब्बीर व कार्याध्यक्ष प्रशांत जैवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.
यावेळी सौ. उमाताई प्रशांत जैवाळ, मेघाताई जाधव, शहबाज शेख, जाकीर खान, हरसिंग छर्रे, विशाल गवई, अस्लम हिरीवाले यांच्यासह अनेक पत्रकार व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करत पत्रकारितेच्या सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपस्थित सर्वांनी सहकार्य केले.

16
1238 views